तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : शहरापासून जवळ असलेल्या रायपूर फाट्यावर हातात तलवार घेवून दहशत निर्माण करणार्‍या 20 वर्षीय तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. संशयीताच्या ताब्यातील तलवार जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शहा शरीफ शहा (20, रा.रायपूर, कुसूंबा, ता.जि.जळगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना रायपूर फाट्यावर तरुण तलवार घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, हेमंत कळस्कर, योगेश बारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सिध्देश्‍वर डापकर, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने कारवाई करत तलवारीसह संशयित समीर शहा याला कुसुंबागावाजवळील फाट्याजवळ अटक केली. त्याच्या ताब्यातील 500 रुपये किंमतीचीा तलवार हस्तगत केली आहे. पोलिस कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !