दुकानातील कामगारांनी केली चोरी ; दोघांविरोधात गुन्हा


जळगाव : शहरातील विसनजी नगरात असलेल्या गल्लीत असलेल्या दुकानातून ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
कल्पेश प्रवीणचंद्र वेद (५०, रा. विसनजी नगर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. विसनजी नगरातील राजेश टेन्ट हाऊसच्या गल्लीत असलेले श्रीनाथजी एजन्सी नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर हेमंत महादू सोनवणे (रा.रामेश्वर कॉलनी) हा दुकानावर नोकरी करतो. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानावर काम करत असतांना हेमंत सोनवणे व त्याच्या सोबत असलेला अनोळखी व्यक्ती यांनी संगनमताने मिळून ५ हजार रुपये किमतीचा कलरचा प्रायमर आणि २ हजार रुपये किमतीचे कलर्स प्लास्टिकचे बादली असा एकूण ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत कल्पेश वेद यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात हेमंत सोनवणे आणि एक अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !