चोपडा पोलिसांच्या जाळ्यात अडकले शस्त्र तस्कर : 14 तलवारींसह चौघांना अटक


चोपडा : अजमेर येथून 14 तलवारींचा साठा घेऊन येणार्‍या चौघांना चोपडा पोलिसांनी अटक केली असून एक जण मात्र पसार झाला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
राजस्थानमधून चारचाकीत तलवारींचा साठा आणला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती. या अनुषंगाने वनविभागाच्या सत्रासेन चेकपोस्टजवळ पोलिसांनी कारवाई केली. या चेकपोस्टवर पोलिस कर्मचारी तैनात होते. पोलिसांनी मध्यप्रदेश सीमेकडून अजमेरहून येणार्‍या ओमनी गाडीची (क्रमांक एम.एच.19 सी.एफ. 4571) तपासणी केली. या गाडीत चार जण तलवारी घेऊन चाळीसगावकडे जात होते. त्यांना पोलिस नाईक राकेश पाटील यांनी पकडले. संशयीत ओमनी चालक मुस्तफीन खान (23), आरीफ इब्राहिम पिंजारी (27), फहीमखान जमील खान (28), सलमान अयुबखान (सर्व रा.चाळीसगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईदरम्यान संशयित मुश्रीफ खान (रा.भडगाव) हा जंगलात पसार झाला.





यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकेश रावले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !