दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला दोन वर्ष शिक्षा


पाचोरा : दुचाकी चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीला सोमवार, 3 जानेवारी रोजी पाचोरा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा व 12 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी एका महिन्याची कैद सुनावली.

गुन्हा झाला सिद्ध
जामनेर तालुक्यातील जंगीपुरा येथील आरोपी गणेश बाबुलाल राजपूत याच्याविरोधात पाचोरा येथील राजेश सुरेशचंद्र कोंडवानी यांच्या फिर्यादीवरून कलम 379 व 34 नुसार दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता. पाचोरा न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या या दाव्यात न्यायमूर्ती एफ.के.सिद्दीकी यांनी सोमवार, 3 जानेवारी रोजी निकाल देत आरोपी गणेश बाबुलाल राजपूत यास दोन वर्षांची शिक्षा, 12 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एका महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणी तपासी अंमलदार म्हणून छबुलाल नागरे, कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, केस वॉच म्हणून विकास सुर्यवंशी, राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.रमेश खंडू माने तर आरोपींतर्फे अ‍ॅड.चंदन राजपूत यांनी कामकाज पाहिले.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !