नशेत विमानतळावर लघूशंका करणार्या आर्यन खानच्या व्हिडिओमागची जाणून घ्या सत्यता….
नवी दिल्ली : अल्लीकडेच सुपरस्टार शाहरूखचा मुलगा आर्यनला रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली होती तर यानंतर आता सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात विमानतळावर आर्यन हा लघूशंका करीत असल्याचा दावा केला जात आहे मात्र प्रत्यक्षात हा व्हिडिओ आर्यनचा नसून प्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा ‘ट्वाइलाइ’ मध्ये काम केलेला अभिनेता ब्रॉनसन पेलेटियर आहे. हा व्हिडीओ 2012 मधील आहे, जेव्हा ब्रॉनसन लॉस एंजेलिसच्या विमानतळावर नशेमध्ये होता आणि लोकांसमोरच त्याने लघुशंका केली होती. या प्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आली होती.
व्हिडिओमुळे आर्यन खान पुन्हा चर्चेत
गतवर्षी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्रूझ रेव्ह पार्टीमधून ताब्यात घेतले होते. सुमारे एक महिना आर्यन खान तुरुंगात होता. आर्यनवर कारवाई करणारे एनसीबीचे मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे यांची वादांमुळे नुकतीच डीआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा आर्यन खान चर्चेत आला आहे.




व्हिडिओ दुसर्याचा मात्र आर्यन खान ट्रोल
सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात दिसणारा व्यक्ती हा आर्यन खान असल्याचे सांगितले जात आहे. हा कथित आर्यन खान नशेमध्ये आहे आणि अमेरिकेच्या विमानतळावर लघुशंका करताना दिसत आहे. या व्यक्तीला सोशल मीडियावर लोक आर्यन खान म्हणत आहेत आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. अनेकजण आर्यन खानला ट्रोल करू लागले आहेत तर काही जण आर्यन खानचे नाव बदनाम केले जात असल्याचे म्हणत आहेत.
महिनाभरानंतर आर्यनला मिळाला जामीन
आर्यन खानला 2021 वर्ष जगातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रेटिंमध्ये दुसर्या क्रमांकावर घेऊन गेले आहे. आर्यन खानला 3 ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवरून ड्रग केसमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर कित्येक प्रयत्नांनंतर आर्यनला मुंबई उच्च न्यायालयाने जामिन दिला होता. जवळपास महिनाभर आर्यन खान तुरुंगात राहिला होता. या प्रकरणामुळे आर्यन खानला गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सेलिब्रेटींमध्ये दुसरा क्रमांक मिळाला.