जळगावातील तरुणीला गुंगीचे औषध देत हैद्राबादला नेले… पुढे घडले असे काही !
जळगाव : शहरातील 26 वर्षीय तरुणीला शीतपेयात गुंगीचे औषध देत अपहरण करण्यात आले व नंतर हैद्राबाद येथे नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शीतपेयातून दिले गुंगीचे औषध
जळगाव शहरातील एका भागात राहणारी 26 वर्षीय तरूणीला 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी संशयीत आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह (रा.नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, तेलंगाणा) याने तरुणीच्या राहत्या घरात शीतपेयात गुंगीचे औषध देवून तिला बेशुध्द केले. त्यानंतर तिला कारमध्ये बसवून थेट औरंगाबाद व तेथून हैद्राबाद येथे तिचे लग्न लावण्यासाठी नेले. तरूणीला दोन दिवस तिच्या इच्छेविरूध्द घरात डांबून ठेवून मारहाणही करण्यात आली तसेच तरुणीच्या होणार्या नवर्याला आणि नातेवाईकांना मोबाईलद्वारे माहिती देवून बदनामी करण्यात आली. कशीबशी तरुणीने संशयीत आरोपीच्या तावडीतून सुटका करीत जळगाव गाठले. या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह (रा.नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, तेलंगाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंनिस शेख करीत आहे.




