जळगावातील अवैध धंद्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे रेड टाकतात तेव्हा…!
जळगावात अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू ? नागरीकांचा सवाल : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कारवाईने उडवली खळबळ
जळगाव : जळगाव राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दखल घेत कारवाई केली त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासन करते तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिस अधीक्षकांच्या छाप्यात 29 संशयीतांकडून दोन लाख 41 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अवैध धंद्यांना आता छुपा आशीर्वाद कुणाचा ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होवू लागला आहे. कारवाईत सातत्य राखून अवैध धंद्यांचा बिमोड करण्याची अपेक्षाही व्यक्त होवू लागली आहे.
स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह
पोलिस अधीक्षकांनी मंगळवारी स्थानिक पोलिसांना सोबत न घेता शनिपेठ पोलिस ठाण्यापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या कुंभारवाड्यातील सट्टापेढी, एमआयडीसी पोलिस पोलिस ठाण्यापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेरा चौक, अडीच किलोमीटरवरील सिंधी कॉलनी व एल. एच. पाटील शाळेजवळ व दोन किलोमीटरवर असलेला तांबापुरा अशा चार ठिकाणी, जिल्हापेठ पोलिस ठाण्यापासून दीड किलोमीटर अंतरावर आंबेडकर मार्केटमधील सट्टापेढी, शनिपेठच्या हद्दीतील इस्लामपुरा येथे जुगार अड्डा, तालुका पोलिस ठाण्यापासून एक किलोमीटर अंतरावरील शंकर प्लाझा येथील व रामानंदनगर पोलिस ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील सोमानी मार्केट येथील सट्टापेढीवरही कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः केलेल्या कारवाईनंतर आता स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटले आहेत. सुज्ञ जनतेतून या कारवाईचे स्वागत केले जात असून कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या संशयीतांविरोधात कारवाई
पोलिस अधीक्षकांच्या कारवाईत समाधान गजमल राठोड (रा. सुप्रीम कॉलनी), शेख मेहमूद शेख फयाज (रा. नशिराबाद) धनराज गोवर्धन राठोड (रा. धानवड), बबलू नाना पाटील (रा. वैजनाथ), विठ्ठल मुरलीधर पाटील (रा. पिंप्री खुर्द), नरेश गणपत भाट, राज सुरेश भाट (दोन्ही रा. सिंगापूर कंजरवाडा) लक्ष्मण श्यामराव सपकाळे, हेमराज जगन्नाथ नाथ (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) अक्रम शेख सलीम शेख (रा. बिस्मिल्ला चौक, तांबापुरा), आसिफ शेख अस्लम शेख (रा.दत्तनगर), निखिल सुरेश पाटील (रा. खोटेनगर), रोहन रमेशलाल जैन (रा. ओम शांतीनगर), नरेंद्र उर्फ शंभू दिलीप भोसले (रा. शिवाजीनगर), सचिन उत्तम जाधव (रा.शिवाजीनगर), जलालोद्दीन रफीउद्दीन शेख (रा. नशिराबाद), महेंद्र देवराम माळी (रा. कांचननगर), मंगल जगन नरसाळे (रा. दिनकरनगर), गणेश संजय शिंदे (रा. खोटेनगर), गोपाळ रामदास महाजन (रा. हरिविठ्ठलनगर), नितीन दौलत सोनवणे (रा. रिधूरवाडा), सखाराम बाबू चौधरी (रा. कांचननगर), रामदास निंबाजी तायडे (रा. महाबळ कॉलनी), सतीश माणकचंद जैन (रा. मयूर कॉलनी), खलिल गनी पिंजारी (रा. खंडेरावनगर), अनिल वना भोई (रा. आशाबाबानगर), कमलाकर रामा सोनवणे (रा. आंबेडकरनगर), नाना छगन बाविस्कर (रा. कानळदा), शरद भगवान पाटील (रा. मेस्कोमातानगर), शैलेश सुरेश चौधरी (रा. शनिपेठ), रवी महाजन या 29 जणांवर कारवाई करण्यात आली.


