वाकी येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
बोदवड : तालुक्यातील वाकी येथील 35 वर्षीय तरूणाने वाकी शिवारातील शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संतोष सुभाष मगरे (35, रा.वाकी, ता.बोदवड, ह.मु. चिंचोल, ता.मुक्ताईनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.
शेतातच घेतला गळफास
संतोष मगरे हा मंगळवार, 4 जानेवारी रोजी बोदवड तालुक्यातील वाकी शिवारातील केशव दौलत पाटील यांच्या शेतात कामानिमित्त गेला असता शेतातील बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आज बुधवारी सकाळी 8.30 वाजता उघडकीला आले. या प्रकरणी मयत तरुणाचे वडील सुभाष मगरे यांच्या खबरीवरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप वानखेडे करीत आहे.




