जळगावातील विद्यार्थ्यांना शस्त्र दाखवत धमकावणारा संशयीत पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्सच्या आवारात तीक्ष्ण हत्याराच्या धाकाने विद्यार्थ्यांना धमकावणार्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
शस्त्राच्या धाकावर धमकावले
जळगाव शहरातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्स परीसरात गुरूवार, 6 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास 20 ते 25 वयोगटातील एक तरुण नशेत हातात तीक्ष्ण हत्यार घेवून जाणार्या व येणार्या नागरीक व विद्यार्थी, विद्यार्थींनींना पैसे मागवून धमकावत होता. यावेळी काहींनी त्याला धुडकावले असता त्यांच्यापाठीमागे लागून त्यांना तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखत होता. यावेळी काही नागरीकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे क्रीडा संकुलाजवळ धडकले व त्यांनी तरुणाला ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले.




