जळगावात उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विधान भोवले : एकाविरोधात गुन्हा
जळगाव : एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी दिड महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहेत. कर्मचार्यांच्या या आंदोलनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या एकाविरोधात जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह विधानामुळे दाखल झाला गुन्हा
एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी.कर्मचारी हे संपावर आहे. दरम्यान बुधवार, 5 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता बसस्थानकाच्या आवारात संपकरी बसलेले असतांना अॅड.सतीश रोठे यांनी एस.टी. कर्मचार्यांना मार्गदर्शन करत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अश्लिल शब्दाचा वापर करून बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने जळगाव जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




