भाजपा आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आशिष शेलार( BJP MLA Ashish Shelar) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
दुसर्यांदा मिळाली धमकी
भाजप नेते आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना यापूर्वीदेखील धमकी देण्यात आली होती. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना एका अज्ञात व्यक्तीकडून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. फोनवरून धमकी देणारी व्यक्ती ही अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी मुंबई पोलिस (Mumbai Police) आयुक्तांना शुक्रवारी पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यांनी धमकी येणार्या दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची मागणी केली आहे.


रेकी केल्याचा प्रकार झाला होता उघड
तर त्यापूर्वी एका अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा अतिरेक्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. या धमकीबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटील यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.
पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी : फडणवीस
आमदार आशिष शेलार (BJP MLA Aashish Shelar) सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात आणि सरकारचा भ्रष्टाचार, सरकारमधला अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणतात, संघर्ष करतात. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.
