भाजपा नेते किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा : ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा बाहेर काढणार
मुंबई : नवनवीन दाव्यांमुळे चर्चेत असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी आता नव्यानेच केलेल्या दाव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. दहा दिवसांत ठाकरे सरकारचा (Maharashtra Govt) कोविड सेंटर घोटाळा (Covid Center Scam) बाहेर काढणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रीकामे पडले असून बीकेसीमध्ये दोन हजार 400 बेडपैकी 800 बेड्सवर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील 99.99 लोक हे सुरक्षित आहेत, असेही सोमय्या म्हणाले आहेत.
कोविड सेंटर हे तर कमाईचे साधन
दहा दिवसात मी ठाकरे सरकारचा (Maharashtra Govt) कोविड सेंटर घोटाळा (Covid Center Scam) प्रसिद्ध करणार असल्याचे सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी सांगत सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून ज्या पद्धतीने टेरर घाबरवण्याचे काम करत आहेत ते का? कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे. येत्या दहा दिवसात या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेसमोर आणणार असल्याच्या दाव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इतकं टेन्शन का पसरवत आहेत. आर्थिक कमाईसाठी सत्ताधार्यांकडून घाबरण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.




धमकीच्या फोनवर सोमय्या म्हणाले ; बघूया सरकार कशी काळजी घेते
आशिष शेलार यांना आलेल्या धमकीच्या फोनवर बोलताना किरीट सोमय्या( BJP Leader Kirit Somaiya) म्हणाले की, शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. बघूया ठाकरे सरकार कशी काळजी घेतात.