जळगावात दुकानदार व सेल्समन भिडले… कारण ऐकाल तर डोक्याला हात माराल
जळगाव : नुतन मराठा महाविद्यालयजवळील एका आईस्क्रीम पार्लरचालक दुकानदार व सेल्समन यांच्यात शाब्दीक वाद हाणामारीवर पोहोचला. या प्रकरणी शहर पोलिसात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
हाणामारीमुळे उडाली खळबळ
रायसोनी नगरातील रहिवासी उमेश शांतीलाल कुमावत (वय-37) हे अरुण आईस्क्रीमवर कामाला आहेत. शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या दुकानावर हँटसन ग्रो कपंनीचा सेल्स ऑफीसर असल्याचे सांगत त्याने लवकर आईस्क्रीमची आर्डर द्या, असे म्हणत वादाला सुरवात झाली. वादाचे पर्यावसन हाणामारीत होवून दोघांनी एकमेकांना मारहाण करत जीवे ठार मारण्याच्या धमकी दिल्या. या वादात दुकानातील संगणकाचे नुकसान झाले. दोघांनी परस्पराविरुद्ध तक्रार दिल्यावरुन जळगाव शहर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. तपास उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.




