चाळीसगावात पत्रकारांचा सन्मान : जेसीआय सिटीचा उपक्रम
चाळीसगाव : चाळीसगाव जेसीआय सिटी टिमच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भडगाव रोड वरील रंभाई आर्ट गॅलरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेसी. धर्मराज खैरनार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुजित वाघ, ज्येष्ठ पत्रकार सी.सी.वाणी सर, माजी नायब तहसीलदार देविदासजी खैरनार तर आयपीपी डॉ.प्रसन्न अहिरे, प्रकल्प प्रमुख मंगेश जोशी उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष जेसी. धर्मराज खैरनार यांनी केले.




वैद्यकीय सेवेसाठी सहकार्याची ग्वाही
यावेळी पत्रकार बांधवांना भेट देण्यात येणायर्या प्रथमोचार पेटीमधील सर्व अत्यावश्यक लागणार्या मेडिसीनची माहिती व ते वाटप करण्यामागचा उद्देश जेसी डॉ. प्रसन्न अहिरे यांनी दिली. कार्यक्रमात पत्रकार रमेश चौधरी, मोतीलाल अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर पत्रकारांच्या वतीने सी.सी.वाणी यांनी आभार मानले. प्रमुख अतिथी सुजित वाघ यांनी पत्रकारांना लागणार्र्या वैद्यकीय सेवेसाठी केव्हाही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रथमोपचार पेटी भेट
सर्व पत्रकार बांधवांना अत्यावश्यक लागणारी वैद्यकीय प्रथमोपचार पेटी जेसीआय चाळीसगाव सिटीच्या माजी अध्यक्षांच्या हस्ते भेट देण्यात आली. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, सचिव एम.बी.पाटील, संजय सोनार, रविंद्र अमृतकार, मोतीलाल अहिरे, जिजाबराव वाघ, सूर्यकांत कदम, देविदास पाटील, मनोहर कांडेकर, मुराद पटेल, अजिज खाटीक, श्रीकांत भामरे, अजय कोतकर, कुणाल कुमावत, रमेश चौधरी, विजय सपकाळे, निलेश परदेशी, योगेश मोरे, महेंद्र सुर्यवंशी, रणधीर जाधव, जीवन चव्हाण, आकाश धुमाळ, रोहित शिंदे, आनंद गांगुर्डे, योगेश्वर राठोड, यश पालवे, पराग सोनार, दिपक कच्छवा, अश्पाक पिंजारी, जाकिर मिर्झा, कैलास सुर्यवंशी, निळकंठ साबणे, मुख्तार खान, आदी पत्रकार उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम मोलाचे
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, बालाप्रसाद राणा, प्रितेश कटारीया, गजानन मोरे, अॅड.शैलेंद्र पाटील, साहिल दाभाडे, जगदिशभाई पटेल, मनोज पाटील, वकार बेग, आतीश कदम, यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन अफसर खाटीक तर आभार सचिव मयूर अमृतकार यांनी मानले.
