शीतपेयातून मद्य पाजत विवाहितेवर वारंवार अत्याचार : या शहरातील घटना


पिंपरी : शीतपेयातून दारू Drink पाजत महिलेचे फोटो काढून ते तिच्या पती व नातेवाईकांना पाठवून बदनामीची धमकी देऊन विवाहितेवर वारंवार अत्याचार (Balatkar) करण्यात आला. तळेगाव दाभाडे व चाकण येथे 20 एप्रिल 2019 ते 20 ऑगस्ट 2021 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेेच्या तक्रारीनुसार संदीप बुरुटे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बदनामीची धमकी देत अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी कोल्ड्रिंक्समध्ये दारू (Drink) पाजून फिर्यादीचे फोटो काढले. ते फोटो फिर्यादीचे आई-वडील नातेवाईक तसेच पती यांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध फिर्यादी सोबत वारंवार लैंगिक संबंध (Balatkar) केले.

हॉटेलसह लॉजवर नेत केला अत्याचार
तळेगाव दाभाडे तसेच चाकण येथे वेगवेगळ्या हॉटेल व लॉजवर आरोपीने फिर्यादीला घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार (Balatkar) केले. फिर्यादी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. बलात्कार प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !