मिनी लॉकडाऊन : जीमसह ब्युटी पार्लरबाबत नव्याने आले हे आदेश


मुंबई : राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढू लागताच राज्य शासनाने अनेक निर्बंध जाहीर केले असून त्याची रविवारी रात्रीपासून अंमलबजावणी होणार आहे. सुरूवातीला जीमसह ब्युटी पार्लरही (Beauty Parlour) बंदचे आदेश काढण्यात आले होते मात्र सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटी पार्लरवरील (Beauty Parlour) निर्बंध मागे घेण्यात आले असून 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्स बंद राहतील, असे आधीच्या आदेशात म्हटलं होते मात्र या निर्णयाला मोठा विरोध झाला होता.

मोक्काच्या कारवाईने महाजनांना कोरोना तर आज जळगावात पडले पाच ठिकाणी छापे

असे आहेत सुधारीत आदेश
सुधारीत आदेशानुसार जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlour) काम करणार्‍यांसह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात नमूद आहे.

हेअर कटींग सलूनासाठी असे आहेत नियम
तर हेअर कटींग सलून (Hair Cutting Salon) 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश कायम आहेत मात्र हेअर कटिंग सलून (Hair Cutting Salon) रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस (Cutting) कापणार्‍या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे, असे आदेशात म्हटलं आहे.

कोरोना विस्फोट : शाळा, महाविद्यालये बंद ; अखेर राज्यात निर्बंध लावले ; एका क्लिकवर जाणून घ्या नियमावली




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !