पत्रकार संरक्षण समिती रावेर तालुकाध्यक्षपदी मुबारक तडवी
खिर्डी : पत्रकार संरक्षण समितीचे राज्याध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा अध्यक्ष आत्माराम गायकवाड व उपाध्यक्ष राजू तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुक्यातील सावदा येथील विश्रामगृहात पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने पत्रकार दिन साजरा झाला. यावेळी रावेर तालुका नूतन कार्यकारीणी निवडण्यात आली. रावेर तालुकाध्यक्षपदी मुबारक तडवी यांची तर रावेर ग्रामीण तालुकाध्यक्षपदी प्रदीप महाराज पंजाबी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
अशी आहे कार्यकारीणी
तालुकाध्यक्ष- मुबारक तडवी, उपाध्यक्ष- राजेश पाटील, सरचिटणीस- तुषार परदेशी, कार्याध्यक्ष- दिलीप भारंबे, सचिव- शेख इद्रीस, ज्येष्ठ सल्लागार- चंद्रकांत कोळी, कार्यवाहक रीतेश चौधरी, सहकार्याध्यक्ष- संतोषसिंग परदेशी, संघटक गुणवंत पाटील, सहसंघटक प्रवीण धुंदले, संघटन प्रमुख- ईश्वर महाजन, प्रसिध्दी प्रमुख- मलक शाकिर, रावेर ग्रामीण तालुकाध्यक्ष- प्रदीप महाराज पंजाबी, सदस्य- भीमराव कोचुरे, विनायक जहुरे, सतीश फेगडे, सुरज गाढे, सादीक पिंजारी, रघुनाथ महाजन, मिलिंद कोरे, योगेश पाटील, प्रभाकर महाजन, समीर तडवी, असलम सलीम तडवी, हमीद शेख, जाकीर खान, प्रशांत महाजन, योगेंद्र भालेराव, दीपक चौधरी, प्रभाकर काशीनाथ महाजन, पुरुषोत्तम महाजन, भागवत पाटील, वाजीद खान, आशिष चौधरी, विजय एस.अवसरमल, विजय काशीनाथ अवसरमल आदींची निवड करण्यात आली.




