जळगावात विवाहितेचा छळ ; पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा


जळगाव : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

छळ असह्य झाल्याने तक्रार
शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील माहेर असलेल्या शीतल वसंत ठाकुर (38, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) यांचा विवाह चिराग हरबन्सलाल अरोरा (रा. फरीदाबाद अरोरा, हरीयाणा याच्याशी) 2008 मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या अगोदर चिराग अरोरा याने विवाहितेच्या आई-वडीलांना विश्वासात घेवून व लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी सोन्याचे दागिने, रोख पैसे याचे अटी ठेवून लग्न केले. दरम्यान त्यानंतर विवाहितेला पुन्हा वेळोवेळी पैश्यांची मागणी करू लागले. पैसे दिले नाही तर विवाहितेचा शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सासरे, सासु, जेठ, जेठाणी, लहान जेठ यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.





यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी रविवार, 9 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता शहर पोलिस ठाण्यात पती चिराग हरबन्सलाल अरोरा, सासरे हरबन्सलाल अरोरा, सासू सरला हरबन्सलाल अरोरा, मोठा जेठ गगन हरबन्सलाल अरोरा, जेठ निकेत हरबन्सलाल अरोरा, जेठाणी ज्योती निकेत अरोरा (सर्व रा.फरीदाबाद, हरीयाणा) यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !