जळगावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
जळगाव : शहरातील लक्ष्मीनगर परीसरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर परीसरात 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. गुरुवार, 6 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पवयीन मुलगी ही टायपिंगच्या क्लासला जाऊन येते, असे आईला सांगून घराबाहेर पडली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या आई व नातेवाईकांनी तिच्या क्लास आणि मैत्रिणींकडे शोधाशोध केली परंतु ती आढळून आली नाही. या संदर्भात अल्पवयीन मुलीच्या आईने रविवार, 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.




