बदनामीपोटी मुलीच्या प्रियकराची हत्या : आरोपीला अटक
वर्धा : मुलीचे असलेले प्रेमसंबंध यामुळे समाज काय म्हणेल? या भीतीने मुलीच्या पित्याने प्रियकराची हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पित्याला अटक करण्यात आली. पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या येसगाव येथे घडली. अमोल बाळकृष्ण ताल्हण असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
बदनामीच्या भीतीने हत्या
मयत अमोलचे येसगाव (मुरगाव) येथील एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना होती. आपल्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध जर समाजात माहिती पडले, तर आपली बदनामी होईल, या भीतीने मुलीच्या पित्याने अमोल याच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत अमोल याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी पित्याला अटक केली आहे. अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी पुलगाव येथे भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


