भुसावळात मास्क न लावणारे रडारवर : पहिल्याच दिवशी 123 नागरीकांविरोधात दंडात्मक कारवाई

: मास्क न लावणारे प्रशासनाच्या रडारवर : 19 हजार 500 रुपये दंड वसुल केला.


भुसावळ : शहरात कोरोनाचा विस्फोट होत असताना प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून आता मास्क न लावणार्‍यांविरोधात धडक कारवाईला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी शहर पोलिस ठाणे हद्दीत 80 तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 43 अशा 123 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून प्रशासनाने 19 हजार 500 रुपये दंड वसुल केला.

शहरात कोरोना नियम पायदळी
शहरात कोरेानाचे संक्रमण वाढत असले तरी अनेक जण नियम पाळत नसल्याने अशांविरोधात पालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहिम उघडत कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारी पालिका व पोलिस विभागाने धडक कारवाई सुरू केल्याने शहरवासीयांमध्ये मोठी खळबळ उडाली. शहर पोलिस ठाणे हद्दीतील महात्मा गांधी पुतळा, हंबर्डीकर चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे, पांडूरंग टॉकीज भाग, अष्टभुजा देवी मंदिर परीसर आदी ठिकाणी विना मास्कने फिरणार्‍यांवर पोलिसांनी थांबवून 100 ते 500 रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला. बाजारपेठ हद्दीत 43 जणांवर कारवाई करून सात हजार 500 रुपये तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 80 जणांकडून 12 हजार असा एकूण 19 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, दुकानदार व अस्थापनेवर काम करणार्‍यांनी लसीचे दोन डोस घेतले नाहीत त्यांच्यावरही प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची कारवाई होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !