चोपडा आगारातील एस.टी.वाहकाचा मृत्यू : जळगाव आगारातील कर्मचारी संतप्त
जळगाव : चोपडा आगारातील (Chopda Depo) वाहकाचा (ST Carrier) कारणे दाखवा नोटीसीच्या धास्तीने हृदयविकाराने मृत्यू (Hart Attack) झाल्यामुळे एस.टी.कर्मचार्यांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वाहकाच्या मृत्यूला एस.टी.महामंडळ (ST) प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जळगाव आगारातील (Jalgaonb Depo) संतप्त संपकरी एसटी कर्मचार्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप अद्यापही कायम आहे. कर्मचारी मागण्यांवर अद्यापही ठाम आहेत. प्रशासनाकडून कर्मचार्यांवर सेवा समाप्ती, निलंबन, कारणे दाखवा नोटीस देत बडतर्फीची कारवाई केली जात आहे. अशाच कारणे दाखवा व नुकसानभरपाईच्या नोटीसीचा धसका घेतल्याने चोपडा आगारातील वाहकाचा मृत्यू झाल्याने कर्मचार्यांमधून संताप व्यक्त होत आहे. एस.टी.संपकरी कर्मचार्यांकडून राज्य शासन (State Government) व प्रशासनाचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली.
जळगाव विभागात एस.टी. कर्मचार्यांचा संपास किमान 70 ते 80 दिवस झाले आहेत. विलीनीकरणासह मृत कर्मचार्यांच्या कुटूंबीयांच्या बाबतीत राज्य सरकारकडून कोणतेही धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी वा कर्मचार्यांच्या हिताचा निर्णय अजूनही झालेला नाही त्यामुळे या कर्मचार्यांचा संप सुरू आहे. या संपात सहभागी असल्याच्या कारणामुळे या कर्मचार्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा तसेच महामंडळाचे आर्थिक नुकसान केले म्हणून नुकसान भरपाईची मागणीचे नोटीसी दिल्या जात आहेत. अशाच नोटीसीचा धसका घेतल्याने चोपडा आगारातील वाहक आर.के. वाणी (R.K.Wani) यांचा सोमवार, 10 जानेवारी रोजी हदयविकाराने मृत्यू झाला. त्यांना यापूर्वी एस.टी.महामंडळाने नुकसान भरपाईची नोटीस बजावली होती.




-
भुसावळात कोरोना वेगाने पसरतोय : रेल्वे हॉस्पीटलचे वैद्यकिय अधिकारीही पॉझीटीव्ह
मृत्यूला महामंडळच जवाबदार
दरम्यान, कर्मचारी वाणी यांच्या मृत्यूला एस.टी. महामंडळाचे प्रशासन (ST) जबाबदार असल्याचा आरोप जळगाव आगारातील संपकरी कर्मचार्यांनी केला आहे. कामाचा व्याप पाहता अत्यंत तोकडे वेतन, इतर राज्यांच्या परिवहन सेवेतील कर्मचार्यांच्या मानानेदेखील वेतन कमी आहे, तसेच आर्थिक ताणतणाव वा अन्य कारणामुळे आतापर्यंत जळगाव जिल्हयात (Jalgaon Jilha) 45 ते 48 एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्या (Suside) वा संसर्ग प्रादूर्भावामुळे मृत्यू झाला आहे. या मृत कर्मचार्यांच्या कुटूंबियांना शासन स्तरावरून कोणतीही मदत मिळालेली नाही ती मदत आणि एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये (State Government) विलीनीकरण केले जावे या मागणीसाठी एसटी (ST) कर्मचार्यांचा संप सुरूच असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत कर्मचार्यांवर अशी झाली कारवाई
जळगाव विभागात एस.टी.चे (ST) परीवहन विभागात चार हजार 272 कर्मचारी वाहक, चालक यांत्रिकी प्रशासकीय असे विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्यापैकी 756 कर्मचारी कामावर हजर आहेत. 55 जणांची साप्ताहीक सुटी वा दौरा तर 129 जण प्रशासकिय रजेवर आहेत तर उर्वरीत सुमारे तीन हजार 346 च्यावर कर्मचारी संपात सहभागी आहेत. या संपात सहभागी असल्यामुळे एस.टी.प्रशासनाकडून आतापर्यत 366 संचित कर्मचार्यांचेे निलंबन, संचित 86 कर्मचार्यांची सेवा समाप्ती, संचित 39 कर्मचार्यांच्या प्रशासकीय बदल्या, 104 संचित कर्मचार्यांना बडतर्फ नोटीस तर संचित 88 कर्मचार्यांवर बडतर्फ कारवाई आली आहे.
