भुसावळात डाव उधळला : पाच जुगारी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील दीनदयाल नगरात जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांच्या (Bajrpet Police) डीबी शाखेला मिळाल्यानंतर पथकाने अचानक मंगळवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास धाड टाकत पाच जुगारींना अटक केली. संशयीतांकडून आठ हजार 700 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात (Bajrpet Police) गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत (Bajrpet Police PI Dilip Bhagwat) यांना दीनदयाल नगर भागातील नारळाच्या झाडाजवळील झोपड्याखाली जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रशांत पाटील, उमाकांत पाटील, दीपक पाटील, प्रशांत सोनार, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, योगेश माळी, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने जुगाराचा डाव उधळत पाच संशयीतांच्या मुसक्या बांधल्या. संशयीतांकडील आठ हजार 700 रुपयांची रोकडसह तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.




यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
बाजारपेठ पोलिसात (Bajrpet Police) पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून संशयीत रहिम शेख मोहम्मद (26, दीनदयाल नगर, भुसावळ), मुकेश सुधाकर बाविस्कर (42, हनुमान नगर, भुसावळ), अकिल अली शकील अली (19, इंदिरा नगर, भुसावळ), रामचंद्र अरुण पाटील (36, दीनदयाल नगर, भुसावळ), संजय बळीराम गिरी (38, गणेशपुरी, सोनिच्छावाडी, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात (Bajrpet Police) गुन्हा दाखल करण्यात आला.
