पाचोर्‍यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन


पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रांताधिकारी यांच्यासाठी निवासस्थान मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे 59 लक्ष रुपये खर्चातून भडगाव रोडवरील शासकीय विश्राम गृहाच्या परीसरात शासकीय निवासस्थान उभारले जात आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार, ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती. यावेळी खुशाल जोशी यांनी विधीवत पूजा केली.
शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. त्याची दखल घेत आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.



अधिकारी व पोलिस बांधवांच्या निवार्‍याचा प्रश्नही सुटणार
पाचोरा शहरात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवारा असावा तसेच प्रत्येक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकार्‍यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागेल, असे आमदार किशोर पाटील म्हणाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर, नंदू पाटील, प्रवीण पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शरद तावडे, अमोल पाटील, राजू पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सुमीत सावंत, आबा कुमावत, जितू पेंढारकर, एकनाथ पाटील यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !