भुसावळात कोरोनाचे 137 तर जळगाव जिल्ह्यात आढळले 270 रुग्ण


जळगाव : जिल्ह्यात कोरोना सुसाट पसरत असून भुसावळात तर सलग तीन दिवसांपासून रुग्ण संख्या शंभरीपार जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे प्रवाशांकडून अधिक कोरोना संक्रमण पसरत असल्याची भीती आहे. जळगाव जिल्ह्यात गुरूवारी एकाच दिवसात तब्बल 270 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. प्रशासनाने नव्यानेच दिलेल्या अपडेट अहवालानुसार एकाच दिवसात भुसावळात आढळलेल्या बाधीतांची संख्या तब्बल 137 असल्याने चिंता वाढली आहे.

आतापर्यंत 2580 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 580 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 44 हजार 162 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. गुरूवारी 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 66
जळगाव ग्रामीण 02
भुसावळ 137
अमळनेर 00
चोपडा 28
पाचोरा 10
भडगाव 01
धरणगाव 03
यावल 02
एरंडोल 03
जामनेर 02
रावेर 04
पारोळा 01
चाळीसगाव 13
मुक्ताईनगर 14
बोदवड 00
अन्य जिल्हा 04




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !