वाळू माफियांच्या मारहाणीत शेतकरी बेशुद्ध : माफीयांनी ठोकली धूम
आव्हाणे गिरणा पात्रात शेतकरी संतप्त ः दोषींवर कारवाईची मागणी
जळगाव : वाळू माफियांची दबंगगिरी जिल्ह्यात नवीन नाही. शेतातून वाळू माफियांनी रस्ता (Road) तयार केल्याने वाहतुकीला मनाई करणार्या शेतकर्याला माफियांनी मारहाण केल्यानंतर शेतकरी बेशुद्ध झाल्याची घटना आव्हाणे येथे गिरणा पात्रात (Girna River) घडली. या प्रकारानंतर घाबरगुंडी उडालेल्या वाळु माफियांनी दोन नदीपात्रातच दोन ट्रॅक्टर सोडून पळ काढला. या प्रकारानंतर शेतकरी संतप्त झाले असून दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे. मनोहर चौधरी (रा.आव्हाणे, ता.जळगाव) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे
विरोध करताच केली मारहाण
मनोहर चौधरी (Monoher Chudhari) या शेतकर्याचे गिरणा नदी पात्रालगत शेत आहे. माफिया नदीपात्रातून वाळू उत्खनन केल्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर, डंपर त्यांच्या शेतातून नेत होते. शेतात रस्ता तयार होत असल्याने मनोहर चौधरी यांनी वाळू माफियांना विरोध केला नंतर त्यांच्यात वाद झाला. वाळूमाफियांनी चौधरी यांना मारहाण केली. मारहाणीत चौधरी बेशुद्ध झाले. नंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आव्हाणेतील ग्रामस्थ घटनास्थळी आले. त्यामुळे वाळूमाफियां गिरणा नदीपात्रात दोन ट्रॅक्टर सोडून फरार झाले . नंतर ग्रामस्थांनी तहसीलदार (jalgaon tahasildar) व पोलिसांना माहिती दिल्यावर महसूल अधिकारी नदीपात्रात दाखल झाले.




महसूल प्रशासनाने झोप उघडावी
गिरणा नदी पात्रातून वाळू (Walu) चोरणार्या माफियांची दादागिरी वाढत आहे. प्रशासनाने वाळू माफियांसमोर (Walu Mafiya) अर्थपूर्ण व्यवहारामुळे हात टेकल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकारी (Collecter) व जिल्हा पेालिस अधीक्षकांनी (Jalgaon SP) वाळू माफियांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी धडक मोहिम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
