जळगावातील 55 वर्षीय महिला बेपत्ता


जळगाव : शहरातील शाहू नगर येथील चंद्रकला चौधरी (55) ही महिला बेपत्ता झाल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात नोंद करण्यात आली. रविवार, 16 जानेवारी रोजी शहर पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याबाबत माहिती प्रसिध्दीसाठी दिली आहे.

महिला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
चंद्रकला चौधरी या 14 डिसेंबर रोजी शाहू नगर येथून कोठेतरी निघून गेल्या. सर्वत्र शोध घेवूनही त्या मिळून न आल्याने चंद्रकला चौधरी यांचे भाऊ ककाशिनाथ तुकाराम चौधरी यांनी 6 जानेवारी रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन शहर पेालिसात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संगीता खांडरे या करीत आहेत. महिला कुणालाही आढळून आल्यास त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !