चोरट्यांनी भैरवनाथ मंदिरातून चांदीच्या छत्र्या लांबवल्या


पाचोरा : तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ मंदिरातून चोरट्याने चांदीच्या तीन छत्र्या लांबवल्या. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
पाचोरा तालुक्यात सावखेडा येथील भैरवनाथ मंदिर असून चोरट्यांनी मंदिरातील 66 हजार रूपये किंमतीचे दोन किलो वजनाच्या तीन चांदीच्या छत्र्या लांबवल्या. हा प्रकार बुधवार, 12 जानेवारी रोजी उघडकीला आला. या प्रकरणी प्रकाश नारायण परदेशी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय माळी करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !