भरधाव ट्रकच्या धडकेत पाचोरा शहरातील विद्यार्थ्याचा मृत्यू


पाचोरा : भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने पाचोरा शहरातील मोटारसायकलस्वार महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर सहकारी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. बुधवार, 19 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान भडगाव आय.टी.आय.जवळ हा अपघात झाला. मनोज अजबसिंग पाटील (17, मूळ रा.नाचणखेडा, ह.मु.जयकिसान कॉलनी) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

निधनाने पाचोरा शहरात हळहळ
मनोज हा भडगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी होता. बुधवारी सकाळी पाचोरा येथून आय.टी.आय. ला जात असतांना हा अपघात घडला. नाचणखेडा येथील शेतकरी कुंटूंबातील मनोज शिक्षणासाठी पाचोरा येथे काकांकडे वास्तव्यास होता शिवाय फावल्या वेळेत कॉलेज चौकातील पुर्ति शॉपजवळ दुध विक्रीचे काम करायचा. अतिशय मनमिळावू व सुस्वभावी मनोजच्या निधनाने त्याचे कुटूंब आणि मित्र वर्गात अतिशय प्रिय होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !