तरुणाला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा
जळगाव : चोरी केल्याच्या राग मनात ठेवून रामेश्वर कॉलनीतील तरुणाला दोघा भावांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसात गुन्हा दाखल
योगेश राजेंद्र चौधरी (22, रा.रामेश्वर कॉलनी) हा तरुण आपल्या कुटूंबासह वास्तव्यास असून योगेश चौधरीने सहा महिन्यापूर्वी मनोज सुरेश पाटील व लखन सुरेश पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) यांच्या दुकानात चोरी केल्याचा आरोप आहे. याचा राग मनात ठेवून शनिवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता संशयीत आरोपी मनोज सुरेश पाटील व लखन सुरेश पाटील या दोन्ही भावांनी लोखंडाच्या दांड्याने योगेशला मारहाण केली. त्यानंतर पाठ, खाद्यांवर तसेच डोक्यावर विट मारून दुखापत केली. तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी योगेश चौधरी याने मंगळवारी 18 जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून मनोज पाटील व लखन पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय धनगर करीत आहेत.




