बॅटरी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी परीसरातून ट्रॅक्टरची बॅटरीची चोरी करणार्‍या संशयीत आरोपी आतीष नरेश भाट (रा.नवल कॉलनी, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातील बॅटरी जप्त करण्यात आली.

बॅटरी चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
दिलीप शिवप्रकाश चांगरे (60) हे नवल कॉलनी, सिंधी कॉलनी शेजारी, जळगाव इथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात.चांगरे हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीसाठी ट्रॅक्टर असून 19 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर त्यांनी घरासमोर ट्रॅक्टर पार्किंग करून लावले होते. अज्ञात चोरट्याने आठ हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टरची एक्साइड कंपनीची बॅटरी चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.






यांनी केली अटक
या गुन्ह्याचा तपास हवालदार हेमंत कळसकर यांच्याकडे होता. ट्रॅक्टरची बॅटरी चोरी करणारा चोरटा निष्पन्न झाल्यानंतर संशयीत आरोपी आतिष नरेश भाट (नवल कॉलनी, जळगाव) याला गुरूवार, 20 जानेवारी रोजी सकाळी अटक करण्यात आली. संशयीताकडून चोरीची बॅटरी हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सुधीर सावळे, विकास सातदिवे, योगेश बारी, चंद्रकांत पाटील यांनी केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !