जळगावच्या शिवाजी नगरात तरुणाची आत्महत्या


जळगाव : शहरातील शिवाजी नगर भागातील तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. समीर रामदास बांदल (शिवाजीनगर हुडको, जळगावत्र असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
समीर बांदल हा शिवाजी नगरात वडील, पत्नी, भाऊ व दोन मुलींसह वास्तव्याला होता. मंगळवार, 18 जानेवारी रोजी समीरच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो जळगावात घरी आला होता. दरम्यान 20 जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास समीर घरी एकटा असतांना त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. समीरचे वडील रामदास बांदल हे कामावरून घरी आल्याने हा प्रकार उघडकीला आला. आत्महत्या करण्याचे कारण समजून आले नाही. समीरची पत्नी माहेरी गेलेल्या होत्या. नातेवाईक विजय लक्ष्मण बांदल यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक ललित भदाणे करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !