जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ.किरण पाटील
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांची नाशिकला बदली
जळगाव : जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची नाशिकला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धरणगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण मुरलीधर पाटील यांची अधिष्ठातापदी (Din) नियुक्ती करण्यात आली.
प्रशासकीय कारणास्तव बदली
जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची वैद्यकीय अधिकारी अधिकारी म्हणून रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागातून आलेल्या आदेशात सांगण्यात आले असून त्यांच्या जागी अधिष्ठाता म्हणून डॉ.किरण पाटील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, धरणगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





