चोरीचा मोबाईल विकत घेतला अन पडल्या पोलिसांच्या बेड्या


जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल विकत घेणार्‍यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हर्षल उर्फ मुन्ना चव्हाण (शिव कॉलनी, जळगाव) असे अटकेतील संशयीताचे
नाव आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा या माध्यमातून उघडकीस आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना संशयीताबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. गुन्हे शोध पथकातील विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील आदींनी शिव कॉलनी भागातील पारीजात संकुलानजीक राहणार्‍या हर्षल उर्फ मुन्ना धर्मेंद्र चव्हाण (21) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी व अंग झडतीदरम्यान त्याच्याकडून सॅमसंग गॅलेक्सी ए – 6 मॉडेलचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.






चोरीचा मोबाईल वापरणे व खरेदी करणे हादेखील गुन्हाच
मोबाईल त्याने त्याचा परीीत नितीन दत्तु पाटील (रा.शिव कॉलनी जळगाव) याच्याकडून एक महिन्यापूर्वी विकत घेतल्याचे मुन्ना चव्हाणने कबुल केले. मोबाईल व मोटार सायकलची जबरी चोरी करण्यात सराईत असलेल्या नितीन पाटील याच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. हर्षल उर्फ मुन्ना धर्मेंद्र चव्हाण हा चोरीचा मोबाईल वापरात असतांना मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईकामी जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !