अत्याचारातून अल्पवयीन पीडीतेने दिला बाळाला जन्म : सहा संशयीतांविरोधात गुन्हा
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणार्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून एका मुलाला जन्म दिला असून या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचारातून पीडीतेने दिला बाळाला जन्म
पाचोरा तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलीचे आईवडील हे ऊस तोडणीचे काम करतात. यासाठी त्यांना जिल्ह्याबाहेर कामासाठी जावे लागते. पीडीत मुलगी व तिचे आईवडील हे कराड, जि. सातारा येथील साखर कारखान्यात लागणार्या ऊस तोडणी साठी सन – 2019 पासुन वास्तव्यास होते. दरम्यान कुटुंबातील एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तीने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.





या संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
या संदर्भात मल्हार पेठ, जि.सातारा येथील पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी दीपक शांताराम सोनवणे, कल्पना शांताराम सोनवणे, शांताराम भगवान सोनवणे, शालिक सोनवणे, सिंधु भरत भिल, भरत भिल या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा गुन्हा शुन्य क्रमांकाने पाचोरा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे करीत आहे.
