वाढदिवसाला तलवार घेवून नृत्य करणार्‍या तरुणाला पोलिसांनी केली अटक


जळगाव : वाढदिवसालाच तलवार घेवून मित्रासह नाचणार्‍या तरुणाला शनी पेठ पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धांत धर्मराज निकम (22, मच्छिबाजार पोलिस चौकी, गल्ली क्रमांक सात, धुळे, ह.मु.मेस्कोमाता नगर, जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

नंगी तलवार दाखवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा
24 रोजी रात्री 10.20 वाजता तरुण वाढदिवसानिमित्त तलवार घेवून नाचत असल्याची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत पाचशे रुपये किंमतीची तलवार ताब्यात घेण्यात आली शिवाय तरुणाला अटक करण्यात आली. मुकुंद मोगल गंगावणे यांच्या फिर्यादीनुसार शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पाटील करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !