पोलिस असल्याची बतावणी करीत जळगावात तरुणीचे लग्नासाठी अपहरण
जळगाव : पोलिस (Police) असल्याचे सांगत जळगावातील 26 वर्षीय तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले मात्र वेळीच पोलिसांची मदत मिळाल्यानंतर तरुणीची सुटका झाल्याची घटना शहरात घडली. 26 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार शनी पेठ पोलिसात (Shanipet Police) आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आम्ही सांगू तेथेच लग्नासाठी टाकला दबाव
पीडीत तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी सागर कापुरे (Sagar Kapure), रत्ना अत्तरदे (Ratna Aterde), एक महिला पोलिस (Lady Police) असल्याची बतावणी केलेली महिला व अन्य संशयीत मुलांनी 20 ते 24 जानेवारीदरम्यान पीडीतेला पोलिस असल्याचे सांगत अपहरण केले व नंतर सागर कापुरे व रत्ना अत्तरदे यांच्या घरात डांबून ठेवले. आम्ही सांगू त्याच मुलाशी लग्न कर अन्यथा जीवे ठार मारू, अशी धमकी देत शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडीतेने केला आहे.





पोलिसांची वेळीच धाव अन सुटका
पीडीतेने परीचयातील व्यक्तीशी संपर्क साधला व त्यानंतर 112 क्रमांकावर मदत मागण्यात आली. शनी पेठ पोलिसांना (Shanipet Police) माहिती कळाल्यानंतर त्यांनी संशयीत आरोपींच्या घरातून तरुणीची सुटका केली व मंगळवारी पहाटे संशयीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा (asp kumar chintha), पोलिस निरीक्षक बळीराम हिरे (pi baliram hire), उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.
