भरधाव कारच्या धडकेत तिघे जखमी
जळगाव : अजिंठा चौकातील ट्रान्सपोर्ट नगरजवळ महामार्गावर कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेसह दोन जणांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सोमवार, 24 जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भरधाव कारची दुचाकीला धडक
सोनाली गणेश लोखंडे (41, रा.अशोकनगर, अयोध्यानगर, जळगाव) यांचा मुलगा जयेश व बहिणीचा मुलगा वैभव असे तिघे (एमएच 19 डीजी 5493) ने दुचाकीने सोमवार, 24 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास जात असतांना अजिंठा चौफुलीच्या पुढे असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरजवळील महामार्गावर भुसावळकडून भरधाव वेगाने येणार्या कार (एम.एच.15 एच.क्यू.0957) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या मधोमध फेकले गेले. यात जयेश आणि वैभव हे दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सोनाली लोखंडे यांनी सोमवारी 24 जानेवारी रोजी कारचालकाविरूध्द तक्रार दिल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विजय पाटील करीत आहेत.





