चाळीसगावात आईचा खून : आरोपी मुलाला 9 वर्ष शिक्षा


जळगाव : चाळीसगाव येथे राहत्या घरात आईच्या डोक्यात कुर्‍हाड मारून खून करणार्‍या मुलाला जळगाव जिल्हा न्यायालयाने नऊ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि 10 हजार रूपयाचा दंड सुनावला.

आईच्या डोक्यात मारली कुर्‍हाड
मंगळवार, 25 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला. शहरातील डेअरी भागातील शिंगाटे मळा व नालंदा विद्यालयाच्या शेजारी राहणारे घरमालक पंडीत हिलाल शिंगटे यांच्या घरात पमाबाई वाल्मिक शेवाळे (50) या आपल्या पती व मुलगासह भाड्याने वास्तव्यास होते. 6 जून 2019 रोजी पमाबाई यांचे पती वाल्मिक शेवाळे हे मुलीच्या मुलांना (नातवंडे) येवला, जि.नाशिक येथे पोहोचविण्यासाठी गेले होते तर दुपारी दोनन वाजेच्या सुमारास घर मालक पंडीत शिंगटे यांची पत्नी स्वयंपाकासाठी कढीपत्ता घेण्यासाठी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घराचा पडदा ढकलून पाहिले असता त्यांना पमाबाई शेवाळे रक्तबंबाळ अवस्थेत मृत झालेल्या आढळल्या होत्या.






दारूच्या नशेत केला मुलाने आईचा
पोलिस तपासात संशयीत आरोपी असलेला मुलगा समाधान वाल्मिक शेवाळे याने आईच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याने हा खून दारूच्या नशेत केला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव न्यायालयात चालले खटल्याचे कामकाज
जळगाव जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते. या खटल्याने सरकार पक्षातर्फे एकूण 19 साक्षीदार तपासण्यात आले होते. यात आरोपीच्या बहिणी आणि मेहुणे हे फितूर झाले हाते. पोलिसांकडे आरोपी समाधान याने गुन्ह्याची दिलेली कबुली आणि रक्ताने माखलेले कपडे याच्या अहवालानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.जी.ठुबे यांनी समाधान वाल्मिक शेवाळे याला दोषी ठरवत मंगळवार, 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता 9 वर्षे सक्तमजूरीची शिक्षा आणि 10 हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !