नात्याला काळीमा : चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार


जळगाव : मध्य प्रदेशातील एका गावातील गरीब कुटुंब नशिराबाद परीसरात रोजगारानिमित्त आले असून या कुटुंबातील चार वर्षीय चिमुकलीवर नात्याने मामा लागणाऱ्या 22 वर्षीय संशयित आरोपीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र पसार झाला आहे.

खेळण्यासाठी बोलवत केला अत्याचार
नशिराबाद परीसरातील एका भागात आलेल्या कुटुंबातील चार वर्षीय बालिकेवर नात्यानेच चुलत मामा लागणाऱ्या नराधम 22 वर्षीय आरोपीने अत्याचार केला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गावात राहणाऱ्या चार वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. १४ जानेवारी रोजी दुपारी चिमुकली ही घरी एकटी असतांना संशयित आरोपीने खेळण्याच्या बहाण्याने बोलवून एकांतात तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !