जळगाव जिल्ह्यात नव्याने २८१ बाधीत आढळले


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत असून रुग्णसंख्या वाढत जात असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बुधवारी पुन्हा जळगाव जिल्ह्यात २८१ बाधित कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे तर २१६ कोरोना रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.

तालुकानिहाय बाधित रुग्ण असे
जळगाव शहर- ७२
जळगाव ग्रामीण- १४
भुसावळ-३२
अमळनेर-१५
चोपडा-२०
पाचोरा-१६
भडगाव- 00
धरणगाव-२२
यावल-२
एरंडोल-६
जामनेर-७
रावेर-५
पारोळा-३५
चाळीसगाव-१५
मुक्ताईनगर- ५,
बोदवड- ०
इतर जिल्ह्यातील ४






आजपर्यंत 2584 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४८ हजार ९९९ बाधीत रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४२ हजार ७८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८४ रूग्णाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६३३ कोरोना बाधीत रूग्ण विविध कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !