अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार : यावल तालुक्यातील घटना


यावल : यावल तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन संशयीत अल्पवयीन आरोपींनी शेतात नेत अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी दुपारी उघड झाली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दोन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून दोघांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पीडीता शौचासाठी बाहेर पडल्यानंतर अत्याचार
यावल तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 26 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी एका गावातील दोघा संशयीत अल्पवयीन आरोपींनी अल्पवयीन मुलीला शेजारच्या शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला. घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलीने घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री आठ वाजता धाव घेवून दोन्ही संशयीत आरोपींविरोधात तक्रार दिल्यानंतर संशयीत अल्पवयीनांविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !