दारूच्या नशेत एकावर शस्त्राने वार : जळगावची घटना


जळगाव : काहीही कारण नसतांना एकाने दारूच्या नशेत शिविगाळ व धारदार शस्त्राने वार करीत तरुणाला जखमी केले. शहरातील शिवाजी नगरातील एस.के. ऑईल मील परीसरात ही घटना घडली. या प्रकरणी मंगळवार, 25 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताचा पोलिसांकडून शोध सुरू
इकबाल दाऊ पटेल (28, रा.कानळदा रोड, जळगाव) हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्यास असून सोमवार, 24 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता तो त्याच्या दुचाकी (एम.एच.19 डी.एम.3665) ने घरी जात असतांना संशयीत आरोपी भोपाली उर्फ विजय वसंत अहिरे (कानळदा रोड, जळगाव) याने दारूच्या नशेत येवून शहरातील शिवाजी नगरातील एस.के. आईल मील जवळ इकबाल पटेल याची दुचाकी अडविली व काहीही कारण नसतांना बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी इकबाल पटेल यांनी शहर पोलिस ठाण्यात रात्री 12 वाजता तक्रार दिल्याने आरोपी भोपाली उर्फ विजय वसंत अहिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील करीत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !