शिरसोलीतील 33 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या


जळगाव : तालुक्यातील शिरसोली (Shirsoli) येथील 33 वर्षीय तरुणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, 28 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. गिरीष प्रकाश पाटील (33, रा.शिरसोली, ता.जि.जळगाव) (girish prakash patil) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, तरुणाने आत्महत्या (suside) का केली? याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश
गिरीष पाटील (girish prakash patil) हा आई वडील, पत्नी आणि भाऊ यांच्यासह शिरसोली येथे वास्तव्यास होता. गेल्या 13 वर्षांपासून तो बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला होता. गुरूवार, 27 जानेवारी रोजी रात्री त्याने कुटुंबियासह जेवण करून झोपल्यानंतर मध्यरात्री मागच्या खोलीत गिरीष पाटील याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी रेणूका शुक्रवारी 28 जानेवारी रोजी सकाळी 5.30 वाजता झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता.






एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
नातेवाईकांनी तातडीने गिरीश यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (midc police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई सुनंदाबाई, वडील प्रकाश पाटील, भाऊ सतीश आणि पत्नी रेणूका असा परीवार आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !