सोन्याच्या पोतसह रोकडवर चोरट्यांचा डल्ला : जळगावातील घटना
जळगाव : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने 18 हजारांची रोकड आणि सोन्याची पोत असा एकुण 39 हजाराचा ऐवज लांबवला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शनिवारी 29 जानेवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून चोरट्याचा शोध
कांताबाई दादाराव वाघ (45, रा.सतगुरू नगर, अयोध्या नगर, जळगाव) या शनिवार,29 जानेवारी रेाजी बेंडाळे चौकातील एटीएम येथे पैसे काढण्यासाठी आल्या असता एटीएम मध्ये आधीच दोन अनोळखी पैसे काढण्यासाठी उभे होते. त्यावेळी कांताबाई वाघ यांनी दोघांना एटीएममधून पैसे काढण्याची विनंती केली. त्यांच्या एटीएममधून दोघांनी पैसे काढून दिले. काढलेले पैसे ठेवण्यासाठी पर्स मध्ये हात घातला असता त्यांना घरून आणलेले 18 हजार रूपये रोख आणि 21 हजार रूपये किंमतीचे सोन्याची पोत असा एकुण 39 हजार रूपयांचा मुद्देमाला अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी 4.30 वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गणेश पाटील करीत आहे.





