जळगावात आरपीएफ जवानाला मारहाण
जळगाव : किरकोळ वादातून आरपीएफ जवानाला शहरातील आकाशवाणी चौकात वाहनधारकाने दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी शनिवार, 29 जानेवारी रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ कारणावरून मारहाण
आरपीएफ कर्मचारी मनोज गिरधर मोरे (37, रा.धरणगाव, जि.जळगाव) शुक्रवार, 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता नोकरीवरून घरी जाण्यांसाठी आकाशवणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले. त्याठिकाणी एक वाहनधारक धरणगाव येथे जात असल्याचे सांगितले. त्यानुसार ते चारचाकी वाहनात बसले. त्यानंतर वाहनधारकाने अचानक ‘धरणगाव जात नाही’, असे सांगितले. याबाबत वाहनधारकाला विचारले असता वाहनधारकाने जवळील दगड उचलून मनोज मोरे यांच्या डोक्याला मारला यात ते बेशुध्द झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी मानेज मोरे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी 29 जानेवारी रोजी अज्ञात वाहनधारकाविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.





