मलकापूर तालुक्यातील जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू
मलकापूर : तालुक्यातील भालेगाव येथील रणगाव शिवारात तूर काढण्याच्या मशीनमध्ये पाय अडकल्याने 20 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पवन श्रीराम बावस्कर (20, रा.भालेगाव, ता.मलकापूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तूर काढताना अडकला मशीनमध्ये पाय
पवन बावस्कर हा रणगाव शिवारातील आपल्या शेतात रविवार, 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता शेतात तूर काढण्यासाठी परीवारासह आला होता. तुर काढण्याच्या मशीनवर काम करत असतांना संपुर्ण तूर काढून झाल्यानंतर शेवटच्या वेळी त्याचा पाय मशीनमध्ये अचानक पाय अडकल्याने गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला नातेवाईकांना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.





