लाहोरीतील एकाला 18 हजारांचा गंडा


पाचोरा : तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील एका व्यक्तीला डेबीट कार्डच्या मदतीने 18 हजारांचा गंडा घातण्यात आला. एटीएममधून परस्पर काढण्यात आल्याने खळबळ उडाली. पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताने काढली रक्कम
ईश्वर बाजीराव जाधव (55, रा.लोहारी बु.॥, ता.पाचोरा) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 29 रोजी सकाळी 10 वाजता ते कामानिमित्त पाचोरा शहरातील बसस्थानक परीसरात आले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या एटीएमच्या डेबीट कार्डच्या नंबरच्या माध्यमातून परस्पर 18 हजार रूपये काढून नेल्याचे उघडकीला आहे. याप्रकरणी ईश्वर जाधव यांनी तातडीने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार भगवान चौधरी करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !