जळगावात दुचाकी चोरटे सैराट : पुन्हा दुचाकीची चोरी
जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट परीसरातील अमर रगडा येथून तरुणाची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी रविवार, 30 जानेवारी रोजी दुपारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
निलेश जगदीश जगताप (30, रा.रायसोनी नगर, जळगाव) हा तरुण खाजगी नोकरीला आहे. मंगळवार, 25 जानेवारी रोजी निलेश जगताप हा कामाच्या निमित्ताने दुचाकी (एम.एच. 19 एच.टी. 9264) ने शहरातील गोलाणी मार्केट येथे दुपारी तीन वाजता आला. गोलाणी मार्केटमधील अमर रगडाच्या दुकानासमोर दुचाकी पार्क करून लावली असता सायंकाळी सात वाजता काम आटोपून घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आला असता त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परीसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही. अखेर रविवार, 30 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.





