अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म : जामनेर तालुक्यातील घटना


जळगाव : अल्पवयीन तरुणीशी आधी प्रेमसंबंध निर्माण करीत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याने पीडीतेने बाळाला जन्म दिला मात्र उपचारादरम्यान सात महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणीज जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

वारंवार केला अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. तिचे मयुर रमेश कोळी या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यादरम्यान लग्नाचे आमिष दाखवित अल्पवयीन मुलीला सुरत येथे पळवून नेले होते तसेच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी अपहरणासह अत्याचाराचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात संशयी मयुर कोळी यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.






जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
जामिनावर सुटका झाल्यानंतर मयुर याने पुन्हा अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. याचदरम्यान मुलीचा पाय भाजला पायावर उपचार सुरू असतांना मुलगी ही गर्भवती असल्याचे समोर येवून तीची प्रसूती झाली. बाळ कमी दिवसाचे असल्याने समोर आले. सोमवार, 31 जानेवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन अत्याचार करणार्या संशयित मयुर कोळी याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !